अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे कलाशिक्षक कविराज बोटे यांच्या शिल्पा ची निवड

0 128
Shilpa of National School High School art teacher Kaviraj Bote selected in All India Marathi Sahitya Sammelan

प्रतिनिधी- DNA मराठी टीम

अहमदनगर –  अहमदनगर शहरांमधील जिल्हा सहकार बँक समोरील कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे शिक्षक कलाशिक्षक श्री कविराज चंदर बोटे यांचे शिल्प महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर  येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यवाहक व कार्याध्यक्ष यांनी  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

यास साहित्य संमेलनामध्ये कविराज बोटे यांनी शिल्प चित्र शिल्प दालनासाठी कलाकृती पाठवली त्याबद्दल संमेलनाच्या समितीतर्फे कविराज बोटे यांचे आभार सुद्धा मानले व होणाऱ्या संमेलन साहित्य संमेलनासाठी कलाकृतीची निवड करण्यात आली आहे असे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे , कार्यवाहक रामचंद्र तिरुके व कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्याकडून कविराज बोटे यांना मिळाले आहे.
Related Posts
1 of 2,427
95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चित्र व शिल्प याची निवड झाल्याबद्दल कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ, मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे यांनी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे कलाशिक्षक कविराज बोटे यांचे अभिनंदन केले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: