
Shevgaon Market Committee:- अहमदनगर : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. १७ मे रोजी या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली आहे. त्यामुळे कौन बनेगा सभापती? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ahmednagar crime: लुटणारी टोळी पकडली…
या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत, असे असले तरी पहिल्या टर्मला नेमकी कोणत्या नावाला पंसती दिली जाते. जुना आणि नव्याचा मेळ घालतात की, दोन्ही चेहरे नवीन चेहरे देऊन कायम ठराविक चेहऱ्यांभोवती फिरणाऱ्या सत्तेला उत्तर-पश्चिम फिरवून बदलत्या राजकारणाचा संदेश देतात अशी चर्चा राजकीय वर्तृळात केली जात आहे.
शेवगांव बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा कार्यकम निवडणूक निर्णय आधिकारी व्ही. यु. लकवाल यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार दि. १७ मे रोजी नवनिर्वाचीत संचालकांची सकाळी ११.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणे. १२.३० ते १ अर्ज माघारीची वेळ देण्यात आली आहे. गरज पडल्यास १ ते दीड दररम्यान मतदान व दुपारी २ वाजता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.