लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या वारसांचा शेतकरी विकास आघाडी मंडळ रिंगणात

0 150
Shetkari Vikas Aghadi Mandal in the arena of the heirs of late Shrinetrao Kolhe and Pradip Aba Patil

प्रतिनिधी- अशोक निमोणकर

जामखेड –  लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांचे वारस दत्तात्रय श्रीरंग कोल्हे व दिपक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळा विविध कार्यकारी सोसायटीसाठी शेतकरी विकास आघाडीचे तेरा उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून त्यांची निशाणी पतंग आहे. विरोधी मंडळाने लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या नावाचा व फोटोचा कोणी वापर करू नये असे आवाहन शेतकरी विकास आघाडीचे नेते दत्तात्रय कोल्हे व दिपक पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

शेतकरी विकास आघाडीचे नेते दत्तात्रय श्रीरंग कोल्हे व दिपक पाटील यांनी जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसाठी तेरा उमेदवार जाहीर केले आहे. कर्जदार मतदार संघातून नवनाथ पोपट बारस्कर, राजेंद्र रामचंद्र हजारे, अविनाश काकासाहेब लेकुरवाळे, काशिनाथ गहीनीनाथ मते, चंद्रहार किसन पागीरे, अरूण नामदेव रोडे, कैलास महादेव वाळुंजकर, शहाजी संभाजी वाळुंजकर (पवार), अनुसूचित जाती जमाती मधुन रूपचंद तुकाराम आव्हाड, महिला मतदार संघातून सौ. आयोध्या रामलिंग हजारे, सौ. सायरा सत्तार शेख, इतर मागासवर्गीय मतदार संघातून शिवाजी तुकाराम कोल्हे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून मच्छिंद्र मारूती सुळ असे तेरा उमेदवार जाहीर करून त्यांची निशाणी पतंग असल्याचे जाहीर केले आहे.
Related Posts
1 of 2,459
दिपक पाटील व दत्तात्रय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी मंडळ निवडणूक लढवित असून या मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, आर. डी. पवार, चेअरमन आजीनाथ हजारे यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पॅनेलने लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या नावाचा व फोटोचा वापर न करण्याचे आवाहन दत्तात्रय कोल्हे व दिपक पाटील यांनी केले आहे.

 

आदीनाथ कारखान्याचे माजी संचालक व जवळा सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. महादेव पवार म्हणाले, जवळा सोसायटी मोठ्या कष्टाने ज्येष्ठ नेते श्रीरंगराव कोल्हे यांनी उभी केली आहे. माझ्या अध्यक्ष पदाच्या काळात तीन मजली इमारत झाली, स्वस्त धान्य व रॉकेल दुकान चालू केली. राज्य सरकारच्या ज्याच्या नावावर शेती तो सोसायटीचा सभासद असे धोरण राबविले जात आहेत. जवळा सोसायटी आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी शेतकरी विकास आघाडीचे सर्व नेते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आमचे मंडळ मोठ्या मताधिक्याने सत्तेवर येईल असा विश्वास डॉ. महादेव पवार यांनी व्यक्त केला.
युवा नेते प्रशांत पाटील म्हणाले, विरोधकांचे जवळा सोसायटीसाठी काय योगदान आहे. या निवडणूकीसाठी सर्व स्तरातून सभासदांचा पाठींबा आहे. तसेच सर्व पक्षिय समविचारी नेते, कार्यकर्ते एकत्र आले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर पक्षाच्या निवडणूक लढवल्या जात नाही. लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांचा आशीर्वाद असल्याने या निवडणूकीत शेतकरी विकास आघाडी पाचशेपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: