
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेंडे ,रसाळ यांच्या पॅनल ला भरघोस मतांनी सभासदांनी निवडून दिले असून या ठिकाणी विरोधकांना मात्र चारी मुंड्या चित केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले विजयी उमेदवारांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.
श्रीगोंदा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले मतदान झाल्यानंतर मतमोजणी ला सुरवात झाल्यानंतर शेंडे,रसाळ गटाच्या सर्व उमेदवारांनी विजयाची माळ खेचून विजय मिळवला आहे यामध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मध्ये रसाळ लक्ष्मण निवृत्ती २७६, भोपळे अमोल बाळासाहेब २७२, शेंडे राजेंद्र गुंडीबा२६९, भदे हौसराव भानुदास२६८, भुजबळ जगन्नाथ गेणु २६१, धेंडे सिताराम बाबू२५०, बेलेकर किसन कोंडीबा२४५, गोरे सखाराम ज्ञानदेव२४०तर अनुसूचित जाती-जमातींमध्ये झेंडे उत्तम एकनाथ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर महिला प्रतिनिधी मध्ये भदे सिताबाई रोहिदास २८४, रसाळ सुरेखा मारुती२६१तर इतर मागास वर्ग प्रतिनिधी मध्ये राऊत दत्तात्रय किसन २५२ तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये गोळेकर संपत बयाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती निवडीनंतर सर्व विजयी उमेदवारांचे सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात होते तर विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती.
मात्र शिंदे आणि रसाळ यांची युती विजयाची खरे दावेदार ठरल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते मात्र विरोधकांना आपला एकही उमेदवार निवडून आणता आले नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होताना दिसत होती विजयी उमेदवारांचे तालुक्यातील सर्वच नेत्यांनी मधून कौतुकही शुभेच्छा वर्षा होताना दिसत होता ात्र सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळत होती.
त्यामुळे येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला नेमकी उमेदवार असणार कोण याबाबत सर्वस्तरातून चर्चेला उधाण आले होते या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अर्जुन वराळे यांनी काम पाहिले.