खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “लेकिन मै थकेगा नही साला..”; पाहा ‘तो’ व्हिडिओ

प्रतिनिधी DNA टीम
पुणे – कलाकार आणि राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) नेहमी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या फॅन्ससाठी कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी इंस्टग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पुन्हा एकदा अमोल कोल्हे चर्चेत आले आहे.
त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्यायाम (Exercise) करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते ट्रकचा मोठा टायर घेऊन ते जिममध्ये व्यायाम करत आहेत. हा टायर एका बाजूने उचलून पलीकडे टाकताना ते दिसत आहेत. हा टायर उचलताना किती कष्ट घ्यावे लागतात हेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संगितले आहे.
”लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हता कि टायर असा घाम काढेल” अस ते म्हणाले आहेत. तर यहा टायर तो फायर निकला…. लेकिन मै थकेगा नही साला असा विश्वासही त्यांनी व्यायाम करताना व्यक्त केला आहे.