ज्ञानवापी प्रकरणात शरद पवार यांचा मोठा विधान; म्हणाले,मंदिर जेवढं..

0 396
Sharad Pawar's big statement in Gyanvapi case; He said, as much as the temple ..

 

केरळ – सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेल्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणात सध्या न्यायालयात (Court) सुनावणी सुरु आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मोठं विधान करत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

 

केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वक्तव्य केले आहे. ज्ञानवापी वादावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधताना म्हटले की, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी मशिदीचे वाद निर्माण केले जात आहे. देशातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार यांनी केरळमधील मेळाव्यात केली. तसेच फेसबुक पोस्टमधूनही केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

 

Related Posts
1 of 2,357

देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारची भूमिका घेत आहे, ती कदापिही योग्य नाही, असे सांगत  पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

 

 

वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. मागील 300 – 400 वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला गेला नाही. अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले जात आहे, असा टोला पवार यांनी भाजपावर लगावला आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: