
शरद पवार राजकारणात सक्रीय राहणे गरजेचे….
संगमनेर : लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत आहेत. त्यांच्या या लढाईत साथ देणारी देशपातळीवरील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे देशाच्या लोकशाही करीता, संविधान वाचवण्याकरीता पवार साहेबांनी सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे असून ते या लढाईतील महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत देशाची लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या युद्धात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे महत्त्व मोठे आहे. देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी पवार साहेबांनी सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे असून ते या लढाईत महत्त्वाची व्यक्ती असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही असेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.