
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केलेली आहे.
काँग्रेस, शिवसेनेतील नेत्यांनी शरद पवार यांच्या राजीनामा निर्णयावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शिवसेनेचे खासदार राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
शरद पवार यांच्या त्या वक्तव्याचा अखेर झाला उलगडा….
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप… प्रत्यारोप… राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे व समाजकारणाचे श्वास आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी दिली.