‘त्या’ प्रश्नावर शरद पवारांनी दिला राज ठाकरेंना उत्तर, म्हणाले, छत्रपती शिवाजी ..

0 407
The election should have been taken seriously, Sharad Pawar's reaction after the defeat

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई –   मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तरसभामध्ये महविकास आघाडी सरकारवर (MVA) जोरदार टिका केली आहे. विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार यांच्यावर टीका करत शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असं म्हणाले होते. आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच मी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २५ मिनिटं भाषण केल्याचा शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की “शिवाजी महाराजांचं नाव मी घेत नाही असा उल्लेख केला. याबद्दल मी सांगू शकतो की दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये होतो. माझं भाषण मागवलं तर शिवाजी महाराजांचं योगदान यावर २५ मिनिटांचं भाषण होतं,” असं शरद पवार म्हणालेत.

Related Posts
1 of 2,357

नेमका शरद पवार काय म्हणाले?
फुले, आंबेडकर शाहुंचा उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे. या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्र सविस्तरपणे कोणी लिहिलं असेल तर फुलेंनी लिहिलं आहे. महाराजांचा कसा आदर्श घेऊन कशाप्रकारे करावा हे या तिघांनी मांडलं आहे, असं पवार म्हणालेत. तसेच पुढे बोलताना शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर आपण आक्षेप घेतल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवण्यामध्ये माँ साहेब जिजाऊंचा वाटा होता. मात्र पुरंदरेंनी तसं लिखाण केलं नाही. या लिखाणाला मी उघडपणे विरोध केला त्याचा मला अभिमान आहे. त्यांनीही कधी यासंदर्भात खुलासा केला नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?
‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली़ त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी आपल्या भाषणात केलेला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: