
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे एका यात्रेतून आपल्या घरी जात असताना हल्लेखोरानी अचानक हल्ला केला, हल्ले खोरांनी त्यांच्यावर तीन फायर झाले त्यापैकी एक गोळ्या त्यांना कमरेच्या खाली भागास लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी राहुल राजळे त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे. प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे कामात अडथळा काढतो म्हणत त्यांनी गोळीबार केल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे मॅक्स केअर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत आता पर्यंत 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच आणखीन आरोपी निष्पन्न होणार असून नेमका हा हल्ला का झाला आणि कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.