विंचरणा नदीच्या काठावर बसणार शंकराची २१ फुट उंच मुर्ती आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारली मुर्ती

0 11

जामखेड –  शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भगवान श्री नागेश्वर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा अंतर्गत भगवान शंकराची मुर्ती बसवण्याचे काम चालू आहे. नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प तयार केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण माध्यमातून जामखेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे शहरात बदल होताना दिसत येत आहे. त्यातच शहरातील धाकटी नदी व विंचरणा नदीचे सुशोभिकीकरण सुरू आहे. याच अनुषंगाने जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या धर्तीवर शहरातील विंचरणा नदीच्या काठावर नगर जामखेड रस्त्यावरील पुलाजवळ भव्य अशी २१ फुट उंच शंकराची मुर्ती बसवण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बागबगीचा देखील करण्यात येणार आहे. सदर शिल्प तयार करण्याचे काम सहा महीन्यांपासून सुरू होते. तर शिल्प ठेवण्याचा कठाडा हा वीस दिवसात कर्नाटक येथील कामगारांनी तयार केला आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड शहर हे प्रेक्षणीय स्थळ व्हावे यासाठी ही मुर्ती बसवण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्या शिल्पा सोबत सेल्फी काढता येणार आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 जागा बिनविरोध

Related Posts
1 of 1,290
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे २१ फुटाचे शिल्प तयार केले आहे. लॉकडाऊन नंतर पहीलेच शिल्प त्यांनी तयार केली असून आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दि १४ रोजीी पाठपुजा करुन हे शिल्प बसवण्यात येणार आहे. तर दि १५ रोजी पांडुरंग देवा शास्त्रीी व ब्रम्हवृंद याांच्य हस्ते महापुजा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.  त्यामुळे जामखेड करांनी जामखेड बदलत आसल्याने समाधान व्यक्त केले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: