कोरोनामुळे शनिअमावस्या यात्रा रद्द शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला निर्णय 

0 11

अहमदनगर –   राज्यातसह जिल्ह्यात मागच्या काही दिवसांनी कोरोनाचा प्रभाव जास्त प्रमाणत वाढत आहे . या कारणाने प्रशासन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणायचा आव्हान करत आहे .  याच आव्हानाला आपला समर्थन दर्शवत  शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवार व शनिवारी बंद ठेवून अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर आणि कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्ष भागवत बानकर म्हणाले कि  शनी अमावस्याला देश भरातुन लाखो भाविक शनीदेवाच्या दर्शनासाठी शिंगणापूर येत असतात. सध्या कोरोनचा संसर्ग वाढत चालल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला . शुक्रवार ( ता .१२ ) दुपारी तीन वाजता शनी मंदिर बंद करणार असुन शनिवारी दिवसभर दर्शन बंद राहणार आहे. रविवार पासुन दर्शन व्यवस्था पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे.

धक्कादायक ! जिल्ह्यात महिला दिना दिवशीच महिलेच्या खुन

शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर , सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे , सरपंच पुष्पा बानकर , सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल ,देवस्थानचे विश्वस्त,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पोलिस प्रशासन तसेच इतर  विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

Related Posts
1 of 1,290

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

 तर दुसरीकडे नेवासाचे  तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी  शनिवारी दिवसभर शनिशिंगणापुरमध्ये जमावबंदीचा आदेश काढला आहे. तर ग्रामस्थांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आव्हाहन सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे.

शिवसेना राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरून नाना पटोले झाले नाराज ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: