शाहरुख खानने घेतली आर्यन खानची भेट.., पहा हा व्हिडिओ

0 369

नवी मुंबई –   गांधी जयंती २ ऑक्टोबर रोजी बॉलीवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याला क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटक करण्यात आली होती. काल दि. २० ऑक्टोबर रोजी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष  न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज देखील नामंजूर केला आहे. तो सध्या मुंबईमधील आर्थर रोड तुरुंगात आहे.या प्रकरणात त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. (Shah Rukh Khan meets Aryan Khan .., watch this video)

जेव्हा शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. पहिल्यांदाच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. प्रशासनाला शाहरुख येणार असल्याची माहिती नव्हती ते अचानक सकाळी ९ वाजता साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. (Shah Rukh Khan meets Aryan Khan .., watch this video)

काँग्रेस नेते सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण

Related Posts
1 of 85

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: