शाहरुख खान मन्नतवरून रवाना, आर्यन खानच्या सुटकेसाठीची प्रक्रिया सुरू

0 182

नवी मुंबई –   मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज (Cruise drugs) प्रकरणात मागच्या २५ दिवसांपासून अटक असलेला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला जेल मधून सुटका करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह इतर दोन जणांना या प्रकरणात दि. २९ ऑक्टोबर गुरुवार रोजी जामीन दिला होता. आज शनिवारी आर्यनची काही तासांनंतर तुरुंगातून सुटका होणार आहे. जामीन आदेशाची प्रत एनडीपीएस न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात पोहोचली असून त्याच्या सुटकेची कागदपत्रे जामीन पत्राच्या पेटीत टाकण्यात आली आहे. (Shah Rukh Khan leaves Mannat, process begins for Aryan Khan’s release)

शुक्रवारी सत्र न्यायालयात जामीनपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली. मात्र, जामिनाची कागदपत्रे मुंबई आर्थर रोड कारागृहातील जामीन पेटीत वेळेवर जमा होऊ शकली नाहीत.त्यामुळे आर्यनची सुटका शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. सुटकेसाठी सुटकेच्या आदेशाची हार्ड कॉपी जेलच्या जामीन पेटीत जमा करावी लागेल. आर्यन खानच्या रिलीझ ऑर्डरची शुक्रवारी संध्याकाळी ५:३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळे त्याला शनिवारी सोडण्यात येणार आहे. आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर जामीन पेटी उघडली. काल आर्यन खानच्या जामीन सुटण्याच्या आदेशाची प्रत देखील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून आज सकाळी १०. ३० ते  १२ च्या दरम्यान सुटका होण्याची शक्यता आहे असे तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

आर्यन खानच्या सुटकेपूर्वी अभिनेता शाहरुख खान त्याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यातून मुंबईतील आर्थर रोड जेलसाठी रवाना झाला आहे. आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.(Shah Rukh Khan leaves Mannat, process begins for Aryan Khan’s release)

Related Posts
1 of 1,677

“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” म्हणत नवाब मलिक यांनी केली एनसीबीची पोलखोल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: