लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नाही- नागपूर खंडपीठ

0 442

नागपूर –   सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधावर मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court) च्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) एक महत्वाचा निकाल  दिला आहे. हा निकाल देताना नागपूर खंडपीठाने  लग्नाचे आमिष न दाखवता दोन प्रौढ व्यक्तिंचे शारीरिक संबंध बलात्कार नसल्याचं स्पष्ट केले आहे. याच बरोबर तसेच यासाठी तरुणाला दोषी धरता येणार नाही हेही नमूद केलं.(Sexual intercourse between two adults without showing the lure of marriage is not rape – Nagpur Bench)

Related Posts
1 of 1,481
यवतमाळ सत्र न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना या प्रकरणी आरोपी तरुणाला दोषी मानत 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तीही उच्च न्यायालयाने रद्द केली. एका तरुणीने 6 ऑक्टोबर 2006 मध्ये आरोपी तरुणावर यवतमाळमधील घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपी तरुणाने तिला लग्नाचं आमिष दाखवून (lure of marriage)  शारीरिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती झाली. गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नाला नकार दिला, असा आरोप करण्यात आला.

इच्छेविरुद्धचे लैंगिक संबंधही बलात्कार नाही : मुंबई सत्र न्यायालय

तर दुसरीकडे  मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल एका खटल्यात न्यायाधीश संजश्री जे. घरत यांनी पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणं कायद्यानं गुन्हा ठरु शकत नाही असं म्हटलं होतं.

या प्रकरणात पीडित महिलेचं मागील वर्षी 22 नोव्हेंबरला लग्न झालं होतं. लग्नानंतर पती आणि सासरचे लोक पीडितेवर बंधनं टाकायला लागली. याशिवाय शेरेबाजी, घालून पाडून बोलणं आणि इतर प्रकारे शोषण करत होते. इतकंच नाही तर पैशांचीही मागणी करण्यात आली, असा आरोप पीडितेने केला. तसेच लग्नानंतर महिनाभरातच पीडित महिलेने पती जबरदस्ती इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवत असल्याची तक्रार केली.

हे पण पहा –Rohit Pawar I ढोल वाजवण्याचा आणि नृत्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही

प्रकरण काय 

हे जोडपं 2 जानेवारी महाबळेश्वर येते फिरायला गेलं. तेथे पतीने पीडित पत्नीच्या इच्छे विरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. यानंतर पीडित महिलेला डॉक्टरांकडे जावं लागलं. तपासणीत पीडितेला लैंगिक संबंधा दरम्यान कंबरेखाली अर्धांगवायूचा झटका आल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर पीडित महिलेने मुंबईत पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. (Sexual intercourse between two adults without showing the lure of marriage is not rape – Nagpur Bench)

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग पीआय विरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: