एकाच कुटुंबातील सात जणांना झाडाला हात पाय बांधून बेदम मारहाण

0 414

चंद्रपुर –   शहरात एकाच कुटूंबातील सात सदस्यांना झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मारहाण  जादूटोणा केल्याच्या संशयातून झाली आहे . या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची ही माहिती समोर आली आहे. (Seven members of the same family were tied to a tree and beaten to death)

मारहाण झालेल्या सात जणांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सात जणांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली असल्याने संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी याप्रकरणेवर आपली प्रतिक्रिया देत दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी औरंगाबाद येथून एकास अटक

Related Posts
1 of 1,608

विजय वडेट्टीवार म्हणाले  जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे राज्यात पुन्हा अशी हिंमत होऊ नये यासाठी निश्चितच आमच्याकडून प्रयत्न केले जातील. पुढील अधिवेशनात यावर अशा विषयावर सविस्तर चर्चा करू,असं त्यांनी सांगितलं आहे.(Seven members of the same family were tied to a tree and beaten to death)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: