गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांची बेकायदेशीर पने बदनामी केल्याच्या श्रीगोंदयातील सेवेकरी यांच्याकडून निषेध

0 220
Sevakari in Shrigonda protests against Gurumauli Annasaheb More's illegal defamation of leaves
 
श्रीगोंदा :- नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ अण्णासाहेब मोरे यांनी बेकायदेशीरित्या बदनामी केलेबाबत श्रीगोंदा येथील सेवेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यामुळे संबंधित लोकांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सेवेकरी यांनी निवेदनातून केली आहे.
Related Posts
1 of 2,357
नाशिक या ठिकाणी परमपूज्य मोरे दादा व त्यांचे सर्व सेवेकरी हे सुमारे ७४ वर्षांपासून गुरुपीठाचे कामकाज कायदेशीर व पारदर्शक पणे चालू आहे.  यांच्या माध्यमातून लोकहिताचे कामे केली जातात या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक अध्यात्मिक तसेच धार्मिक स्तरावर तसेच शेती विषयक मार्गदर्शन देण्यासाठी भारतभर मेळावे घेण्यात येतात त्यासाठी अनेक ठिकाणी सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत.  त्यांच्या माध्यमातून बाल संस्कार, युवा प्रबोधन, स्वयंरोजगार, विना हुंडा सामुदायिक विवाह,व्यसनमुक्ती, या सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात असे सर्व काही असताना अमर रघुनाथ पाटील व चंद्रकां गणपत पाठव या दोन्ही लोकांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता वैयक्तिक स्वार्थासाठी खोटे अर्ज करून त्या अर्जावरून वर्तमानपत्रात तसेच स्थानिक चॅनल ला बातम्या प्रसिद्ध करून स्वामी समर्थ गुरुपीठात ५०कोटी रुपयांचा अपहार झाल्याबद्दल व आदिवासींच्या जमिनी बाबत व बांधकामाबाबत बेताल वक्तवे केली आहेत.

 

 त्यामुळे स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या मोठ्या प्रमाणात धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत तरी त्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत त्यामुळे त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन सर्व सेवेकरी यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिले आहे या निवेदनात गणेश लोखंडे,पद्मिनी कदम,प्रवीण क्षीरसागर,निखिल भागवत,गोरख कविटकर,डॉ संतोष हिरडे,मनीषा खेडकर, सुशीला राऊत,सचिन डाके,सचिन शिंदे,पल्लवी नांगरे,संगीता कवीटकर,दीपक बनकर,फक्कड मोटे आदी सेवेकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: