हरकती व सूचनांचा निपटारा वस्तूनिष्ठ निर्णय घेण्यासाठी पाहता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ दिवसाचा कालावधी वाढवला

0 8

जामखेड – नगरपरिषद व नगरपंचायत प्रारूप याद्यावर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना आल्या असून आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे निर्णय घेण्याकरीता अधिक कालावधी लागणार असल्याने व राज्यात सध्या वाढत असलेले कोवीड रूग्णांची संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधीत १५ दिवसाची वाढ केली आहे यामुळे १ मार्च रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी १५ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.

जामखेड नगरपरिषदेची प्रारूप मतदार यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती व दि. २२ पर्यंत हरकती व सूचना घेण्यासाठी कालावधी दिला होता व दि १ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. दि. २२ पर्यंत २०६७ इतक्या हरकती नगरपरिषद कडे प्राप्त झाल्या त्यामुळे या हरकतीचा निपटारा करण्यासाठी प्रशासक अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २१ प्रभागात तलाठी, ग्रामसेवक, नगरपरिषद कर्मचारी व मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नियुक्ती करून दि २५ पर्यंत अहवाल देण्याचे सांगितले होते.

दि २५ रोजु प्रत्येक प्रभागात आलेल्या हरकती व सूचनाची दखल संमदित नियुक्त समिती घेत नसल्याची तक्रार राहून उगले, वसीम सय्यद, मनोज कुलकर्णी, प्रशांत राळेभात, डिगांबर चव्हाण, फिरोज बागवान, अमोल गिरमे यांनी घेऊन स्थळ पंचनामा करून संमदीत प्रभागात जेथे राहत असेल त्या प्रभागात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रशासक जयश्री माळी यांनी हरकती व सूचनावर आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे वस्तूनिष्ठ निर्णय घेण्याकरीता अधिक कालावधी लागेल असे सांगितले.

यावर मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मतदार यादीत जे पत्ते आहेत ते प्रभागनिहाय विधानसभा मतदारयादी त्या ज्या भागात आहेत त्याप्रमाणात तो माणूस त्या प्रभागात राहील असे सुचवले परंतु इच्छुक उमेदवारांचे समाधान झाले नाही. यावेळी अनेकांनी मागील नगरपरिषदेसाठी जशी मतदार यादी आहे त्याप्रमाणे मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

Related Posts
1 of 1,292

सध्या असलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक फाटाफूट मतदारांची झाली असून एका प्रभागात घर व दुसऱ्या प्रभागात मतदान असा प्रकार झाला असून माजी नगरसेवकांनी असे प्रकार केले असून सदर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने आता मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी १५ दिवस वाढवला असल्याने नियुक्त समितीचे कामकाज चालू राहील व सर्व शंकांचे निरसन होईल असे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: