सीरम इन्स्टीट्युटकडून होणार जून महिन्यात करोनावरील दुसरी लस लॉन्च अदर पुनावाला यांनी दिले संकेत 

0 12

पुणे – भारतात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी  सीरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्यानं तयार केलेली कोविशील्ड लस  वापरली जात आहे. आता सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया लवकरच करोनावरील नवीन लस लॉन्च करणार आहे असे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षात जून महिन्यात सीरम कोरोनावरील दुसरी लस लॉन्च करणार आहे अशी माहिती पुनावाला यांनी ट्विटरवर ट्वट करून दिली आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास ती देशातील तिसरी करोना लस ठरेल. ‘सीरमनं नोवावॅक्ससोबतच्या भागिदारीतून तयार केलेल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष उत्तम आहेत. भारतात चाचण्या सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे. जून २०२१ मध्ये कोवोवॅक्स लॉन्च करू अशी आशा आहे,’ पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

       अण्णा तुम्ही आंदोलन फक्त काँग्रेस राजवटी मध्येच करणार का ? – शिवसेना 

Related Posts
1 of 1,291

  हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत… – अजित पवार

सध्या  सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसींचा वापर भारतात सुरू आहे. कोवॅक्सिनची निर्मिती हैदराबादस्थित भारत बायोटेकनं भारत वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीच्या सहकार्यानं केली आहे. कोवॅक्सिन लस पूर्णपणे भारतीय आहे. तर कोविशील्ड लसीसाठीचं संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं केलं आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचं उत्पादन करत आहे.

कोणी कोणत्या चष्म्यातून पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे – अण्णा हजारे

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: