नुपूर शर्माच्या वक्तव्यावर देशभरात खळबळ, शुक्रवारच्या नमाजानंतर परिस्थिती बिघडली

0 271
Sensation spread across the country over Nupur Sharma's statement, the situation worsened after Friday prayers

 

नवी दिल्ली –  नुपूर शर्माने (Nupur Sharma) पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थांबताना दिसत नाही. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीच्या जामा मशिदीपासून ते प्रयागराज आणि कोलकातापर्यंत लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. या वेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. बहुतांश भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील अटाळा परिसरात मोठा गोंधळ उडाला. शुक्रवारच्या नमाजासाठी शेकडो लोक जमले होते, नमाजानंतर या लोकांनी निदर्शने सुरू केली आणि घोषणाबाजी केली. मुस्लिम समाजातील लोक नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत सतत घोषणा देत होते. या निदर्शनाला अचानक हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनीही बळाचा वापर केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. त्याचवेळी यूपीची राजधानी लखनऊ व्यतिरिक्त देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही प्रचंड गोंधळ झाला. देवबंदमध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील अटाळा भागात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

Related Posts
1 of 2,222

परिस्थिती नियंत्रणात – दिल्ली पोलीस 
राजधानीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही लोकांना तेथून हटवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र परवानगी न घेता निदर्शने करण्यात आल्याने आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

 

प्रकरण काय ?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. दुसरीकडे नुपूर शर्माच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस कडक झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी नुकतेच नुपूर शर्मा, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 32 जणांवर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: