ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0 142

लखनऊ –    यूपीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान (Kamal Khan) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले. कमाल खान यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी शोक व्यक्त केला आहे. कमाल खान यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. ही पत्रकारितेची कधीही भरून न येणारी हानी असल्याचे योगी म्हणाले. कमाल खान हे चौथ्या स्तंभाचे आणि निष्पक्ष पत्रकारितेचे भक्कम चौकीदार होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.असे देखील त्यांनी म्हटले आहे. (Senior journalist Kamal Khan dies of heart attack)

लखनऊच्या बटलर पॅलेस कॉलनीत राहणारे कमाल खान हे NDTV या वृत्तवाहिनीमध्ये मागच्या काही काळापासून काम करत होते. या वृत्तवाहिनीमध्ये ते  कार्यकारी संपादक पदावर होते.   त्यांची वेगळी पत्रकारितेची शैली लोकांना खूप आवडली.  कमाल खान यांच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेकांनी  प्रतिक्रिया व्यक्त करून शोक व्यक्त केला.

मोठी बातमी ! एसटीत आणखी 400 खासगी चालकांची भरती

Related Posts
1 of 1,635
कमाल खान यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला होता. (Senior journalist Kamal Khan dies of heart attack)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: