किराणा दुकानात गुटखा विक्री; गुटख्यावाल्यानेच केला गुटख्यावाल्याचा कार्यक्रम

श्रीगोंदा शहरानजीक असणाऱ्या हॉटेल अनन्या जवळ गुटखा कारवाई केली खरी पण ती कारवाई पोलिसांमधील गुटखा व्यावसायिकांनी इतर गुटखा व्यवसायिक यांच्यावर केली आहे मात्र झाल्यावर श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात तुटवडा निर्माण झाल्याने पूर्वी १५ रु ना मिळणारी गुटख्याची पुडी आता २५ रुपयांना मिळत आहे त्यामुळे कारवाई मुळे गुटखा महागला आहे असे म्हणणे काही वावगे ठरू शकत नाही मात्र या प्रकरणामध्ये गुटख्यावाल्यानेच गुटख्यावाल्याचा कार्यक्रम केला आहे अशी खुलेआम चर्चा होताना दिसत आहे तसेच तालुक्यासह ग्रामीण भागात किराणा दुकान जनरल स्टोअर्स या दुकानाच्या अडून येथे गुटखा विक्री केली जाते.
याबाबत एका व्यावसायिकाने एक गुप्त माहिती अशी दिली आहे कि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पाथर्डी फिवर मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या सक्रिय आहेत मात्र ते जे काही करतात ते वरिष्ठांच्या आदेशाने करतात असे लोकांना खुलेआम सांगतात पण झालेल्या कारवाई मध्ये गुटख्यावल्यानेच गुटख्यावाल्याचा काटा केला असल्याची जोरादार चर्चा आहे विचारणा केली तर पोलीस सांगतात वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली व गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे यात वरिष्ठ अधिकारी यांचाही सहभाग आहे कि काय ? अशी पाल अनेकांच्या मनात चुकचुकली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यासह शहरी भागात विक्रीसाठी पोलिसांकडून विकत गुटखा घेतला तर त्यात किरकोळ नफा राहतो मात्र तोच माल कर्नाटक येथून मागवला तर त्यात लाखो रुपये राहतात मात्र पोलिसांकडून घेतलेल्या मालाला संरक्षण मिळते आणि डायरेक्ट मागवलेला माल एकतर पकडला जातो नाहीतर चोरीला जातो त्यामुळे पोलिसांकडूनच माल घेतलेला परवडतो असे एका गुटखा व्यावसायिकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.