राज्यस्तर स्केटिंग स्पर्धेसाठी अ.नगर जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीने निवड चाचणी

0 13

निंबळक: – अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंगच्या वतीने दिनांक रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तर स्केटिंग निवड चाचणीचे आयोजन
प्रियदर्शिनी पब्लिक स्कुल, भिंगार, अहमदनगर येथे होणार आहेत.

अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटना हि अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत संघटना असुन स्केटिंग असोसिएशन अॉफ महाराष्ट्र, रोलर स्केटिंग फेडरेशन अॉफ इंडिया, अॉलम्पिक असोसिएशन अॉफ महाराष्ट्र, अॉलम्पिक असोसिएशन अॉफ इंडिया यांच्याशी सलग्न आहे. सदर स्पर्धेत स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी, ईनलाईन हॉकी ई. स्केटिंग प्रकारांची निवड चाचणी होणार आहे.

  मैत्रिणींबरोबर जवळकी वाढल्याचा राग मनात ठेवून तरुणाने केली 19 वर्षीय तरुणाची हत्या

स्पीड स्केटिंग प्रकारात वयोगट व जन्मतारखा:-

१) वयोगट ५ ते ७, २) वयोगट ७ ते ९  ३) वयोगट ९ ते ११,  ४) वयोगट ११ ते १४, ५) वयोगट १४ ते १७, ६) वयोगट १७ व पुढिल जन्मवर्ष २००३ व त्याअगोदरचे असावे.

Related Posts
1 of 1,292

धक्कादायक !महिलेची हत्या करून मृतदेहवर अ‌ॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न

या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंची निवड हि राज्यस्तरावर होणार आहे. तरी ईच्छुक खेळाडूंनी सोबत वयाबाबतचा दाखला आणणे आवश्यक आहे. तसेच संघटनेच्या वतीने अधिकृत प्रशिक्षण वर्ग (टिम स्पीड स्केटिंग अॅकेडमी) बुरुडगाव रोड, महानगर पालिका विभागीय कार्यालय, जुनी शाळा नं.१६ येथे व (टिम अेम) प्रियदर्शिनी पब्लिक स्कुल, भिंगार येथे चालवले जातात. सदर स्पर्धेच्या अधिक माहिती साठी संघटनेचे सचिव असिफ बाबुलाल शेख ९८९०७८६५५८ व राष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू सतिष गायकवाड ९२७०११७४७ यांच्याशी संपर्क साधावा.

नाना पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्ष पद तर विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: