प्रवरा नदी मध्ये अवैध वाळू उपसा करताना वाळू सह मुद्देमाल जप्त; एक आरोपीला अटक

0 258
Seizure of property with sand while extracting illegal sand in Pravara river; One accused arrested
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 संगमनेर –  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत प्रवरा नदी मध्ये अवैध वाळू उपसा करताना वाळू सह ५ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये लक्ष्मण रंगनाथ पांडव यास अटक केली आहे.
Related Posts
1 of 2,326
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्ये आदेशाने संगमनेर हददीत अवैध धंद्यावर कारवाई करत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि , प्रवरा नदीपात्रातुन पाटीलमळा , संगमनेर खुर्द , ता संगमनेर येथुन इसम लक्ष्मण रंगनाथ पांडव हा एका लाल रंगाचा महिंद्र ५७५ कंपनीचा टॅक्टर ट्रॉली मधुन शासकीय बाळुची विना परवाना बेकायदा चोरुन वाहतुक करणार आहे.  आत्ता चाँद शिपली चौक , संगमनेर खुर्द येथे सापळा लावल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने पोलीस नाईक सचिन आडबल,पोलीस नाईक शंकर  चौधरी, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोळुंके ,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव हे पथक बातमीतील नमुद ठिकाणी असता १८/१५ वा . सुमारास  चाँद शिपली चौक , जुना पुणे रोड , संगमनेर खुर्द , जि . अ.नगर येथे सापळा लावून थांबलो एक लाल रंगाचा टॅक्टर त्यास ट्रॉली असलेला प्रवरा नदीपात्राचे रोडने शिपली चौकाकडे जुना पुणे रोडच्या दिशेने येतांना दाता दिसला आमची व पंचाची खात्री झाल्याने सदर टॅक्टर चालकास थांबण्याचा इशारा केला.
ट्रॅक्टर ट्रॉलीत  शासकीय वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लक्ष्मण रंगनाथ पांडव , वय ४० , रा . खराडी , ता संगमनेर , जि . अ.नगर असे असल्याचे सांगितले , त्याचेकडे सदर टॅक्टरचे मालका बाबत विचारपूस करता त्याने सदरचा ट्रॅक्टर हा माझेच मालकिचा असल्याचे सांगितल्याने वरील चालकास वाळु वाहतुकीचा परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले सदर टॅक्टर चालक मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करुन वाहतुक करतांना मिळुन आले ताब्यात असलेल्या टॅक्टर टॉली  एक विना नंबरचा लाल रंगाचा महिंद्रा ५७५ टॅक्टर वाळू सहित ५,१०,०००  एकुण वरील वर्णनाची व किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने  सदर टॅक्टर टॉली व शासकिय वाळुचा पंचनामा पोना / अमित महाजन यांनी जागीच करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन आरोपी व मुददेमालासह पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला . अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन आडबल यांनी त्याचे विरुद्ध भादवि कलम ३७ (९) प्रमाणे फिर्याद दिली. पुढील तपास संगमनेर शहर पोलिस करत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस नाईक सचिन आडबल, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के,पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोळुंके ,पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांनी ही कारवाई केलेली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: