
मुंबई – 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वीरेंद्र सेहवागने ( virendra sehwag) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा खुलासा केला होता. याचे कारण होते एमएस धोनी. वास्तविक, काही सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यामुळे कर्णधार माहीने वीरूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. सेहवागने सांगितले की, तेव्हा सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला वनडेतून निवृत्ती जाहीर करण्यापासून रोखले होते. तिरंगी मालिकेत भारताच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये सेहवागने 6, 33, 11 आणि 14 धावा केल्या. यावर कर्णधार एमएस धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. भारताने त्या सीबी मालिकेतील बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला.
विराट कोहली आपल्या खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा विचार करेल का असे विचारले असता सेहवागने ही गोष्ट शेअर केली. तो म्हणाला, ‘2008 मध्ये जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा माझ्या मनात हा (निवृत्तीचा) प्रश्न आला होता. मी कसोटी मालिकेत पुनरागमन केले आणि 150 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये मला तीन-चार प्रयत्नांत तेवढी धावा करता आल्या नाहीत. सेहवाग म्हणाला, ‘जेव्हा एमएस धोनीने मला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले तेव्हा माझ्या मनात एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा विचार आला. मला वाटले की मी कसोटी क्रिकेट खेळत राहीन.
सचिनकडून मिळालेल्या सल्ल्याचा संदर्भ देत तो म्हणाला, ‘त्यावेळी सचिन तेंडुलकरने मला थांबवले. तो म्हणाला की हा तुमच्या आयुष्यातील वाईट टप्पा आहे. जरा थांबा, या दौर्यानंतर घरी परत जा, विचार करा आणि मग पुढे काय करायचे ते ठरवा. सुदैवाने त्यावेळी मी माझ्या निवृत्तीची घोषणा केली नव्हती.
विराट कोहलीबद्दल तो म्हणाला, ‘दोन प्रकारचे खेळाडू असतात – ज्यांना आव्हाने आवडतात. तो अशा प्रसंगांचा आनंद घेतो आणि विराट त्यापैकीच एक आहे. तो सर्व टीका ऐकतो. मी दुसऱ्या बाजूला होतो. माझ्यावर कोणी टीका केली याची मला पर्वा नव्हती. मला खेळायचे होते, धावा काढायच्या होत्या आणि घरी जायचे होते.