DNA मराठी

त्या संचालकांचे अज्ञानच समोर येतेय…

सदस्यत्व व तज्ज्ञ संचालकपद रद्द करण्यासाठी विरोधी दोन व माजी सेवानिवृत्त संचालक प्रा. सुभाष कडलग यांच्यासह

0 7

नगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ व तज्ज्ञ संचालक भाऊसाहेब कचरे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे सदस्यत्व व तज्ज्ञ संचालकपद रद्द करण्यासाठी विरोधी दोन व माजी सेवानिवृत्त संचालक प्रा. सुभाष कडलग यांच्यासह काही सभासदांना हाताशी धरून उपनिबंधक कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यातून त्यांचे अज्ञानच दिसून येते, असा खुलासा अध्यक्ष अशोक ठुबे यांनी केला.

शेवगाव ची दंगल पूर्वनियोजित, आपल्या मनगटात दम ठेवा – विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

ठुबे म्हणाले, संस्थेच्या घटनेमध्ये सेवानिवृत्त सभासद एखाद्या कर्जदारास जामीन असल्यास त्याचे सदस्यत्व राहते. मात्र त्याला कर्ज मुळीच मिळणार नाही या शर्तीवर चाल ठेवले जाते. असा स्पष्ट उल्लेख आहे. भाऊसाहेब कचरे हे अद्यापही संस्थेच्या कर्जदारास जामीन आहेत. तसेच संस्थेच्या उपविधीप्रमाणे पतसंस्था, सहकारी बँका, व्यापारी बँका, सेवक पतसंस्था यामधील अनुभवी व्यक्ती किंवा सनदी लेखापरीक्षक यांची नेमणूक तज्ज्ञ संचालक म्हणून करता येईल,

Related Posts
1 of 30

असे नमूद आहे. प्रा. कचरे हे गेली सलग २५ वर्षे १२ हजार सभासदसंख्या असलेल्या संस्थेचे संचालक असून, अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्याही त्यांच्याच नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळ सत्तेत आहे. त्यामुळे पगारदार सेवक पतसंस्थेमध्ये काम करण्याचा त्यांना दीर्घकाळ अनुभव आहे. हे सर्व आमच्या . सभासदांना ज्ञात आहे, असे ठुबे यांनी म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: