विज्ञान आता विद्यार्थ्याच्या द्वारी! शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0 15

नवी मुंबई  –  अंतराळाची व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला.  आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी या अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रकल्पांचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनाच्या आरोग्य नियमांचे पालन साजरा करण्यात आला.

कर्जत जामखेड या तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने “सफर अंतराळाची”तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा श्रीमती वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच आमदार  रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितत संपन्न झाला. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे द्वारे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तारांगण मध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण प्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती मिळेल तसेच टेलिस्कोप द्वारे प्रत्यक्ष ग्रह, तारे बघायला मिळतील. आपल्या आकाशगंगा , ग्रह , तारे, अंतराळ या सगळ्या गोष्टींबद्दल उत्कंठा निर्माण होईल आणि भविष्यात या क्षेत्रात आपले करियर घडवतील, या अपेक्षेने आपण सदर प्रकल्प सुरू केलेला आहे.

जो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही  – रुणाल जरे

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच इतर मुलांना आपल्या घरीच किंवा शाळेत बसून आकाशगंगा पाहावयास मिळणार आहे. या मुळे विद्यार्थ्यांत चिकित्सक दृष्टीकोन व वैज्ञानिक जिज्ञासीवृत्ती जोपासली जाईल. शिक्षणात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने रोहित पवार यांनी योजलेल्या या अनोख्या प्रकल्पाचे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रशंसा केली.आज  नव्या आधुनिक कल्पना येत आहेत व ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांतील, वस्तीशाळातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात कसा राहील याचा विचार करत आहेत ही खरी शैक्षणिक क्राती करण्याचे काम आजचे युवा नेतृत्व करत आहे याबद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा मंत्री यांनी रोहित पवार यांचे कौतुक केले.

Related Posts
1 of 1,292

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाज हित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे असे करत असताना राजकीय दृष्टीकोन न ठेवता विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्ता साधली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम समजावा आणि त्यांनी डिजिटल शिक्षण आत्मसात करावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत देण्यात आहे. यापूर्वी २०० शाळांमध्ये सदर पॅनल देण्यात आले असून उर्वरित २०० शाळांमध्ये आता देण्यात येईल. याप्रसंगी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बेलवंडी फाट्या नजीक टँकर पलटी होऊन कात रस्त्यावर सांडल्याने अनेक जण घसरून पडले

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: