श्रीगोंद्यात शाळा, महाविद्यालयांबाहेर गुटख्याची विक्री, पोलिसांची बघ्याची भूमिका

0 131

 

श्रीगोंदा ;- श्रीगोंदा शहरासह ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या पानपट्टय़ांमध्ये तसेच छोटय़ा दुकानांत सर्रास गुटखा, सिगारेटची विक्री केली जात आहे. मात्र या प्रकाराकडे पोलीस रीतसर कानाडोळा करताना दिसत आहेत त्यामुळे या खुलेआम गुटखा विक्रीचे गौडबंगाल आहे तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या पानपट्टय़ा तसेच छोटय़ा दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, मात्र काही विक्रेते गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री करतात. शहराच्या मध्यभागात अनेक शाळा आहेत. शाळांच्या परिसरातील छोटय़ा दुकानांतून गुटखा, सुपारी मिक्स अशा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे.

पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अशा दुकानांवर कारवाई करण्यात येत नसल्याने सर्व काही खुलेआम चालू आहे तर काही दुकानदार विक्रेते आडमार्गाने गुटखा, सुपारी मिक्स अशा पदार्थाची विक्री करत आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असताना सर्व काही मनमोकळे चालू आहे त्यामुळे या प्रकाराकडे पोलीस रीतसर कानाडोळा करताना दिसत आहेत त्यामुळे या खुलेआम गुटखा विक्रीचे गौडबंगाल आहे तरी काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात गुटखा विक्रीत माफियांची साखळी ताकदवान होत असताना कारवाईतील कलमांवरून वाद सुरू आहेत. छोटी- मोठी कारवाई करा आणि गुन्हेगार आरोपींना जामीन मिळू द्या, या प्रक्रियेला पोलिसाकडून पाठिंबा मिळत असल्याने कारवाईचे घोडे अडले आहे.असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

Related Posts
1 of 2,427

कलम काय?
विषारी किंवा विषसम पदार्थाचा उपयोग करून जिवास नुकसान करण्याचा प्रयत्न, अशा आशयाची नोंद कलम ३२८ मध्ये करण्यात आली असल्याने हे कलम दखलपात्र व अजामीनपात्र ठरते. त्याचा आधार घेऊन माफियांविरुद्धचे गुन्हे अजामीनपात्र व्हावेत आणि झाले पाहिजेत असा आग्रह धरला जात आहे.

 

 

अभंग साहेब आरोपी कधी अटक करणार ?
श्रीगोंदा काष्ठी रोडवर झालेल्या गुटखा कारवाई चा गुन्हा तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभंग यांच्याकडे देण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी उमेश वेताळ या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने सद्दाम पठाण व समीर सय्यद तसेच अमोल अजबे पोलीस कर्मचारी यांची नवे घेतली होती मग यांना अटक करण्यासाठी अभंग साहेब नेमकी कश्याची वाट पाहत आहेत हे मात्र कळत नाही त्यामुळे अभंग साहेब आरोपी कधी अटक करणार ? असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.

दादा सोनवणे
पत्रकार श्रीगोंदा
९४२२२७७५५६

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: