तुम्हाला फोन पे वर रिवॉर्ड लागला म्हणत लंपास केले 1 लाख 33 हजार रूपये

0 192

रत्नागिरी –   देशात ऑनलाइन पद्धतीने एखाद्या माणसाची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. असाच एक प्रकार रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील एका गावात घडला आहे.  मी फोन पे (phone pay) कंपनीकडून बोलत आहे,तुम्हाला कॅशबॅक रिवॉर्ड (Cashback Rewards)  लागलेला आहे असे सांगून एका तरूणीला तब्बल 1 लाख 33 हजार 951 रूपयांची फसवणूक केल्याची  घटना उघडकीस आली आहे. जेव्हा आपली फसवणूक झाल्याची तरूणीचे लक्षात आले तेव्हा तरूणीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार नितीनकुमार सिंग असे नाव सांगून भामट्याने तरूणीला गंडा घातला.वेतोशी गावातील नंदिनी निंबरे (वय 22) या तरूणीला एक फोन आला. त्यात ‘मी फोन पे कंपनीकडून बोलत आहे. तुम्हाला 4 हजार 999 रूपयांचा कॅशबॅक रिवॉर्ड लागलेला आहे.

आजारी बाळाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या जिपचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

Related Posts
1 of 1,487

त्याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल हॅण्डसेटमध्ये एनीडेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनचा कोड, नंदिनी निंबरे यांच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचा पिन द्यावा लागेल असं सांगण्यात आलं.  त्यावर नंदिनी यांनी पिन देताच त्या भामट्याने त्यांच्या खात्यातून 1 लाख 33 हजार 151 रूपये लंपास केले. आपल्या खात्यातील पैसे कमी झाल्याचे समजताच नंदिनी निंबरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: