बेकायदेशिररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

0 209
अहमदनगर –  श्रीरामपूर (Shrirampur) येथील वार्ड नं. २ मधून बेकायदेशिररित्या गावठी कट्टा व जिवंत काडतूस कब्जात बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करून अटक केली आहे . या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीकडून एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व एक जिवंत काडतूस असा एकूण ३० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Related Posts
1 of 1,463

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उप महानिरीक्षक सो, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र शोध मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे . या मोहिमेअंतर्गत अवैध अग्निशस्त्रांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीरामपूर शहर व तालुका परिसरामध्ये अवैध अग्निशस्त्रांची गोपनीय माहिती घेत असताना दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक हा श्रीरामपूर येथे वार्ड नं. २ परिसरात गावठी कट्टा बेकायदेशिररित्या कब्जात बाळगून फिरत आहे, आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकॉ / मनोहर गोसावी, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, पोकॉ/ रणजित जाधव, सागर ससाणे अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने बेलापूर पोलीस दुरक्षेत्र येथून निघून वार्ड नं. २, श्रीरामपूर येथे जावून मिळालेल्या बातमीनुसार पापा जलाल रोड, वार्ड नं. २ येथे सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच बातमी मधील नमुद इसम हा पापा जलाल रोड येथे संशईतरित्या फिरताना दिसला. पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री झाल्याने सदर संशईत इसमास घेराव घालून ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, पत्ता साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक, वय- २४ वर्षे, रा. पापा जलाल रोड, वार्ड नं. २, श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व एक जिवंत काडतूस असा एकूण ३०,५००/-रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे.

वरील नमुद इसम नामे साजिद उर्फ मुनचून खालीद मलीक, वय – २४ वर्षे, रा. पापा जलाल रोड, वार्ड नं. २, श्रीरामपूर हा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या आपले कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ/२१४५ मनोहर सिताराम गोसावी, नेम- स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर यांनी श्रीरामपूर शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ॥ ६८३/२०२१९, भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पो.स्टे. करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: