
Ahmednagar crime :- पाथर्डी : सोन्याच्या घाऊक व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी (Pathardi) येथील दोघा सराफ व्यावसायिकांसह गेवराई (Gevrai) येथील एकावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई (जि. बीड) ( Beed) येथील नितीन अर्जुनराव उदावंत (वय ३५) हे हल्ली वाघोली (जि. पुणे) येथे राहत होते. ते सोन्याचा घाऊक व्यापार करत होते.
Ahmednagr news: शेतकऱ्यांचे बिल मागितल्याने कारखान्याकडून धमक्या.. पोलिस संरक्षणाची मागणी..!
उदावंत यांनी पाथर्डी शहरातील सोन्याचे दुकानदार ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक यांना गेवराई येथील नीलेश माळवे यांच्या मध्यस्थीने दोन लाखांचे सोने उधार विकले होते. वर्षभरापासून टाक पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. तसेच शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. याबाबत मृत उदावंत यांनी नातेवाईकांना माहिती दिली होती. २५ मार्चला नितीन उदावंत हे पाथर्डी (Pathardi) येथे उधारी घेण्यासाठी आले होते. सायंकाळी बसमध्ये त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी पाथर्डी (Pathardi) येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. मृताचा भाऊ किरण अर्जुनराव उदावंत यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.
मयत नितीन उदावंत यांना विषारी पदार्थ प्राशन करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून ओम टाक, प्रशांत टाक व मध्यस्थ नीलेश माळवे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
– Gevrai – Beed