सराफ बाजारामध्ये घसरण सुरूच , तीन हजाराने चांदीच्या दरात कमी

0 12

नवी मुंबई –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला होता.  त्या दिवसापासून सराफ बाजारात सुरू असलेली घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहत चांदीच्या किमतीत  तीन हजार रुपयाची घसरण होऊन चांदी ७० हजार रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार ९०० रुपयांवर आले .

राज्यात राष्ट्रवादी बरोबर काँग्रेसलाही उपमुख्यमंत्री पद मिळणार  ?

केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचे भाव कमी-कमी होत असल्याचे तीन दिवसांपासून चित्र आहे. पहिल्या दिवशी एक हजार रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात ३ फेब्रुवारी रोजी एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली. तर आज  ही घसरण आणखी वाढून थेट तीन हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी झाले व ती थेट ७० हजार रुपये प्रति किलोवर आली .

१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या

Related Posts
1 of 1,291

अशाच प्रकारे सोन्याच्या भावात पहिल्या दिवशी ५०० रुपयांनी व दुसऱ्या दिवशी  ४०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर आज पुन्हा ६०० रुपयांनी घसरण होऊन सोने थेट ४८ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले. अर्थसंकल्पाच्या दिवशी दरातील चढउतार कायम होते.

   शहरात मटका बुकी व मावा विक्री करणाऱ्यांनवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: