
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पर्यंत पोलिसांनी अनेक एसटी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याच दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी खळबळजनक दावा केल्याने अनेक चर्चंना उधाण आले आहे.
संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले नेते आहेत. त्यांच्या सर्व विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपासून संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. वारंवार त्यांच्या भूमिका बदलत आहे. त्यांची विधान येत आहे. मला तर संशय येतोय की संजय राऊत यांनी काही नियोजन पद्धतीने कार्यक्रम केला की काय अशी शंका आहे. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्या मागे हात असावा, अशा प्रकार शंका घ्यायला त्यांची वाव आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे’ असा दावाच दरेकर यांनी केलं आहे.
तसंच, ‘मीडियाला कळते आणि मीडियावाले आंदोलनाच्या ठिकाणी उभे राहतात. आदल्या दिवशी मोर्चेकरांना आवाहन तिथे होतं. मग अशा वेळी संजय राऊत यांचे सरकार आहे, पोलीस काय झोपा काढत होते का? पोलिसांच्या गुप्त विभागाचे हे अपयश आहे. जी लोक आपल्या नेत्यांची संरक्षण करू शकत नाही, आपल्या नेत्यांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांनी राज्याच्या हिताची गोष्टी करू नये, या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे, असंही दरेकर म्हणाले.