DNA मराठी

अन्.. संजय राऊतांनी दिला पालकमंत्र्यांना इशारा; म्हणाले, जर पालकमंत्री..

0 239
In that case, Sanjay Raut got angry; The big reaction given about the Chief Minister, said ..
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
मुंबई –  राज्यातील महाविकास आघाडी (MVA)मधील घटक पक्षात मतभेद असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. या चर्चांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाष्य केले आहे मात्र तरीदेखील मतभेदीच्या बातम्या समोर येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चांवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केला आहे.
Related Posts
1 of 2,482

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, काही खासदारांनी आपल्या भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंवाद दौऱ्यासाठी खासदार गेले होते, चार चार दिवस जिल्ह्यात राहिले. संघटनात्मक बांधणी बद्दल अहवाल बनवले. आता अधिवेशन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सगळ्यांची बैठक होईल. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांबद्दल तक्रारी येत आहेत पण त्या तक्रारींमध्ये तथ्य़ नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावं लागेल. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला हे सरकार आपलं आहे असं वाटावं. मविआतल्या प्रत्येक मंत्र्याचं हे कर्तव्य आहे की पक्ष न पाहता त्यांनी प्रत्येकाचं ऐकून घेतलं पाहिजे. नाराजी असणे हे सामान्य आहे. त्यासाठी एकत्र बसून सूचना द्यावा लागतील. आपण जर पालकमंत्री असू तर खाली शिवसेना आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. हा सर्वच पालकमंत्र्यांसाठी (Guardian Minister) इशारा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा मंत्रिमंडळात काही खांदेपालट करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यासंदर्भात तीन पक्ष मिळून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतील. त्यावर मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही. नक्कीच काँग्रेसचे आमदार आलेले आहेत. ते काल वेणुगोपालना भेटले. माझीही त्यांच्याशी चर्चा झाली. प्रत्येकजण आपल्या हायकमांडला भेटायला येत असतो. आता शिवसेना सोडली तर प्रत्येकाचे हायकमांड दिल्लीतच आहेत.

अजानच्या भोंग्यांबद्दल सध्या राज्यात चाललेल्या चर्चा बद्दल संजय राऊत म्हणाले कि , “राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपशासित राज्याचे प्रमाणही जास्त आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचं पालन व्हायला हवं”.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: