DNA मराठी

संदीप मिटके यांची मोठी कारवाई; मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा, एकाला अटक

0 1,073
Sandeep Mitke's big action; Midwifery raid on prostitution business, one arrested

 

अहमदनगर –   DYSP संदिप मिटके (Sandeep Mitke) यांच्या पथकाने मोठी कारवाई करत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावात मध्यवस्तीतील एका वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन पीडित परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. या  पोलिसांनी एका महिला  आरोपीला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार 9 मे 2022 रोजी श्रीरामपूरचे Dysp संदिप मिटके यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी त्यांच्या पथकातील काहींना  गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3,4,5,7,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

Related Posts
1 of 2,493

यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता  व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि PI दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

सदरची कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi  राजेंद्र  आरोळे, HC औटी, HC  जायभाये, लक्ष्मण बोडखे,  PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: