समीर वानखेडेंना नोकरी गमवावी लागणार आहे – नवाब मलिक

0 200

नवी मुंबई –   ०२ ऑक्टोबर रोजी  क्रूझ पार्टी ड्रग्ज (Cruise party drugs) प्रकरणात कारवाई करणारे एनसीबी(NCB) चे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) हे सातत्याने एकापाठोपाठ एक आरोप करत आहे. त्यांच्या या आरोपांमुळे क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात दररोज काहींना काही खुलासा होत आहे.  (Sameer Wankhede will have to lose his job – Nawab Malik)

याच दरम्यान नवाब मलिक यांनी  क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)  याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला फसविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडेंना नोकरी गमवावी लागणार आहे असे असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तर नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
Related Posts
1 of 1,640

एका प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, माझ्याकडून सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. अन्यथा त्यांनी (समीर वानखेडे) राजीनामा द्यावा. माझ्या जावयाला अशाच प्रकरणामध्ये गोवण्यात आले होते आणि आता आर्यन खानलाही फसवण्यात आले आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावरही मलिक यांनी बनावट प्रमाणपत्र देऊन मागासवर्गीयाची नोकरी हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे.

बनावट जात प्रमाणपत्र आणि मागासवर्गीयांच्या नोकरीशी संबंधित प्रश्नावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रियी दिली आहे. या दाव्यांवर मला १०० टक्के खात्री आहे. उद्या मी त्यांचा निकाहनामा ट्विटरवर पोस्ट करेन. मी दिलेली सर्व मूळ कागदपत्रे आहेत. जर ती बनावट असतील तर त्यांना मूळ कागदपत्रे दाखवू द्या, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (Sameer Wankhede will have to lose his job – Nawab Malik)

पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, वानखेडेंवर दाखल होणार गुन्हा ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: