Sambhaji Raje: संभाजीराजे यांनी घेतला मोठा निर्णय ; लवकरच करणार घोषणा

0 243
Sambhaji Raje: Sambhaji Raje took a big decision; An announcement will be made soon

 

पुणे  –  संभाजीराजे (Sambhaji Raje) आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार असून ते लवकरच आपल्या राजकीय वाटचालीच्या संदर्भात मोठी घोषणा करणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचा लक्ष त्या पत्रकार परिषदावर लागून आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला त्यामुळे ते कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती सक्रिय राजकारण करणार आहेत. केंद्रीय पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची चाचपणी केल्यानंतर मर्यादा लक्षात घेत स्वतंत्र भूमिका घेऊन एकला चलो रे चा नारा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजी छत्रपती हे नव्या राजकीय संघटनेची किंवा पक्षाची तयारी सुरू करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घोषित करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची घेतली भेट

Related Posts
1 of 2,459

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आता लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. 10 मे रोजी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, ‘माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण काही जे बोलायचे आहे ते मी 12 मे ला बोलणार आहे’, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली होती.

 

पुण्यात आज मेळावा जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी..नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय..‘ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार ही शक्यता आता मावळत चालली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: