
अहमदनगर – शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वर टीका केली त्याला मनसेचे नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी रोकठोक पणे उत्तर दिले महापुरुषांचा अवमान करण्याची सवय हि शिवसेनेला आहे. राष्ट्रवादी प्रमाणे जातीपातीचे राजकारण करण्याची पद्धत हि शिवसेनेने जोपासली आहे. २७ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुरावा करताना सारस नगर भागाला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण करा यासाठी आंदोलनं केले होते त्यांनतर हा विषय महानगर पालिका महासभेत ३० डिसेंबर २०१७ रोजी मंजुर झाला हा विषय मंजुर होऊन देखील आजपर्यंत शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना देखील त्या भागाला आई सावित्री बाई फुले नगर नावाचा फलक लावण्यात आला नाही.