शहरातील विविध प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

0 9
श्रीगोंदा  –  श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतीन गट क्र. २३९६/२ मधील अनधिकृत बांधकाम काढणे, बायपास रस्त्यालगत अभ्यासिकेवर झालेले अतिक्रमण व पारगाव रस्ता दुरुस्त करण्यास नगरपरिषदेकडून टाळाटाळ होत असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी या आंदोलनाची दाखल घेत एक महिन्याच्या मुदतीत कारवाई करण्याचे आश्वासन  दिले असल्याची माहिती  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, सतीश बोरुडे यांनी दिली.
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक २३९६/२ मधील ४० आर या ग्रीन झोनमधील शेतजमिनीत एका खाजगी शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सर्व नियम धाब्यावर बसवुन अनधिकृतपणे झालेले असून या बांधकाम संदर्भात पालिकेचे नामनिर्देशित अधिकारी अभियंता हे जाणीवपूर्वक या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास कसूर करत असून संबंधित संस्थेच्या अध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे संबंधित अभियंताविरुद्ध नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १८९ (१३) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच बायपास रस्त्यालगत अभ्यासिका व क्रीडा संकुलाचे अतिक्रमणामुळे काम अपूर्ण  आहे या अभ्यासिके वर अतिक्रमण झालेले असून हे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून दिनांक ०९/०१/२०२१ रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली व त्यांनी केलेल्या आदेशामध्ये एक महिन्याच्या आत सदर अतिक्रमणे काढावेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पालिकाप्रशासनाला केले होते .

 

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून या ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा 

मात्र याबाबत एक महिना उलटला तरीही कुठलीही कारवाई पालिकेने केलेली नाही. तसेच श्रीगोंदा शहरात १७ रस्त्याची कामे गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र  या मधील पारगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यावरील पडलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. तसेच मांडवगण रोड आणि शनी चौक परिसरातील काम ठेकेदाराने पूर्ण केले नसल्याने खड्डे तसेच ठेवण्यात आले असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  या बाबत पालिका प्रशासन व ठेकेदार गंभीर दिसत नाही या खड्यामूळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यापूर्वी जीवित हानी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे आणखी किती बळी पालिका प्रशासनाला अपेक्षित आहेत?  अशी विचारणा नागरिक करताना दिसत असल्याने सदरील खड्डे तातडीने कायमस्वरूपी बुजवण्यात यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
Related Posts
1 of 1,291

  ‘या’ नाजुक कारनावरुन केला खून ; टाकळी कडेवळीत खून प्रकरण : पाच आरोपीना अटक..!

या आंदोलनाची दाखल घेत श्रीगोंदा शहरानजीकचा गट नं. २३९६/२ मधील अनधिकृत बांधकाम नगर रचनाकार यांचेकडून समक्ष पाहणी करून एक महिन्याचे आत कारवाई करण्यात येईल. तसेच बायपासलागत अभ्यासिका, क्रीडासंकुल परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून सदरील अतिक्रमण एक महिन्यात काढण्यात येईल. तसेच शहरातील १७ रस्त्यामधील पारगाव,  मांडवगण रोड आणि शनी चौक  परिसरातील अर्धवट रस्त्याचे काम ३१ मार्च २०२१ पूर्वी पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले असून मुख्याधिकारी खरंच कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, शहराध्यक्ष दिलीप लबडे, अजिनाथ मोतेकर, देविदास माने, युवराज पळसकर, शांताराम पोटे, संदीप कुनगर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात १८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलीच नाही कोरोनाची लस

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: