डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त,समता मशाल रॅली संपन्न

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
श्रीगोंदा :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या संयुक्त जयंती निमित्त ऐतिहासिक पेडगाव मध्ये समता मशाल रॅली काढून समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. या रॅली मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांसह सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
सुरुवातीस तथागत नगर येथील नालंदा विहारात मा. उपसरपंच अहमदभाई पिरजादे यांच्या हस्ते ॲड. नितीन घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी समता व एकतेचा संदेश देणारी मशाल पेटवून रॅली काढण्यात आली.त्यानंतर रॅली ग्रामपंचायत कार्यलयासमोर पोहचली, सरपंच सौ सुलोचना कणसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर ही रॅली गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळ वर पोहचली. शौर्यस्थळावर संभाजी महाराजांना व आपल्या राजासाठी बलिदान देणाऱ्या रायप्पा व कवी कलश या मावळ्यांना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे नगर मार्गे तथागत नगर पर्यंत काढण्यात आली. फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे फलक रॅलीत पहावयास मिळाले.
Related Posts
या कार्यक्रमास सरपंच सौ सुलोचना कणसे, उपसरपंच सौ पूजा कणसे, भगवानराव कणसे,प्रकाश घोडके, प्रकाश म्हस्के, संतोष शिंदे,,तहीर शेख,यश ओहळ,भीमराव मस्के, राजेंद्र पंडित, प्रेम खेडकर ,इरफान काझी, इरफान पिरजादे, महेंद्र म्हस्के, वसंत सकट दाजी, सुभाष दिवटे,सचिन दिवटे, म्हनडुळे भाऊ साहेब, नारायण कणसे, साहिल शेख, ननुभाई चौधरी, विनायक दिवटे,अनिकेत घोडके,अनिकेत म्हस्के,शुभम म्हस्के,प्रमोद घोडके, सौरव वनशिव, सौरभ दिवटे, भाऊसाहेब घोडके, विनोद म्हस्के, अमोल घोडके, सिद्धार्थ खेडकर, घोडके काळू, म्हस्के युवराज, युवराज घोडके, जालिंदर खेडकर, अभिजीत घोडके,रोहित दिवटे,दयाराम शिंदे,प्रसाद साळवे विजय काराळें,लखन शिंदे,प्रवीण म्हस्के,तुषार म्हस्के,ओम घोडके,सागर घोडके, सचिन साळवे,गणेश घोडके,काळू शिंदे ,हृतिक म्हस्के,नितीन म्हस्के,सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील आंबेडकरी चळवळीतील भीमक्रांती मित्र मंडळ व भारतीय संविधान संघर्ष समिती यांचे कार्यकर्ते, हिंदू मुस्लिम समाज बांधव व पेडगाव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून चार दिवस चाललेल्या या प्रभोधनात्मक कार्यक्रमात पहिल्या दिवशी अलकताई गायकवाड यांनी मी रमाई बोलते हे एकपात्री नाटक सादर केले, दुसऱ्या दिवशी प्रकाश वाघमारे लिखित भीमा तुझ्या जन्मामुळे हे चाळीस कलाकारांचे बाबसाहेनबांच्या जीवनावर आधारित महानाट्य,तिसऱ्या दिवशी प्रा. प्रशांत चव्हाण यांचे व्याख्यान व चौथ्या दिवशी निळा ध्वज अनावरण व रॅली असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठ ॲड. नितीन घोडके सर, चळवळीतील मार्गदर्शक दीपक म्हस्के,ग्रा पं. सदस्य प्रकाश आबा घोडके, राहुल घोडके,किरण शिंदे, गणेश वनशिव, गणेश शिंदे,ऋषिकेश दिवटे व सुरज साळवे,अनिकेत रणधीर व त्यांच्या सर्वच युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.