Samantha-Naga Chaitanya Divorce | आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे

0 301
नवी मुंबई –  मागच्या काही महिन्यापासून समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni ) आणि नाग चैतन्य (Nag Chaitanya)च्या यांच्या घटस्फोटाची सुरु होती.  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आज दोघांनीही त्याच्या  घटस्फोटा बद्दल शिक्कामोर्तब केले आहे. काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने  सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Related Posts
1 of 96

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.

हे पण पहा  – Ahmednagar | सफर चंद्रा वरची | Ride is on the moon

‘या’मुळे रंगली घटस्फोटाची चर्चा

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी 2017मध्ये लग्न केले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वाची क्यूट जोडी मानली जायचे. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य कुटुंब नियोजनाचा विचार करत होता आणि त्यासाठी त्याने समंथा हिने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी इच्छा होती.

अहवालानुसार, सामंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरवरील प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रीत करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नाहीत. दुसरीकडे, सामंथा तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत आहे आणि या क्षणी ती काम सोडायला तयार नाही आणि आता ज्या प्रकारे तिने नवीन चित्रपट साईन केला आहे, असे दिसते की तिला खरोखरच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. असेही म्हटले जात आहे की, सामंथाने घटस्फोटासाठी 50 कोटींची पोटगी मागितली आहे.

दिलासा! रुग्ण संख्यात कमी, जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची नोंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: