सलमान खान करणार होता अभिनेत्री जुही चावलाशी लग्न, मात्र वडिलांनी…

0 337
नवी मुंबई –  ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय अभिनेत्री असणारी जुही चावला (Juhi Chawla) आज आपला ५४वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. जुही सध्या चित्रपटापासून सुरू असली तरीही ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. ती सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. (Salman Khan was going to marry actress Juhi Chawla, but his father)
आपला बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना तिने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहता (Jai Mehta) शी लग्न केलं.त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) देखील जुहीच्या प्रेमात होता. त्याने जुहीच्या वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती.
Related Posts
1 of 96
या बाबत खुलासा स्वतः सलमान खान ने एक मुलाखतीमध्ये केला होता. जुही ही एक चांगली मुलगी आणि गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे ती एक उत्तम सुन आणि पत्नी होऊ शकते असे मला वाटले होते. त्यामुळे मी तिच्या वडीलांकडेदेखील लग्नासाठी जुहीचा हात मागितला होता. मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नसल्यामुळे त्यांनी मला नकार दिला असे सलमानने म्हटले होते. जुहीने जय मेहताशी गुपचूप लग्न केले होते. फक्त ठराविक लोकांनाच तिच्या लग्नाची माहिती होती. लग्नाबद्दल समजल्यानंतर करिअरला ब्रेक लागू नये म्हणून गुपचूप लग्न केल्याची कबुली तिने नंतर एका मुलाखतीत दिली.(Salman Khan was going to marry actress Juhi Chawla, but his father)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: