प्रकरण काय?
अशोक पांडे हे सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ शूट केला होता. मात्र या व्हिडीओमुळे सलमानच्या अंगरक्षकाने आणि सलमानने असभ्य वर्तन केल्याचा आरोप अशोक पांडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मोबाईलही हिसकावत धमकावल्याचाही आरोप त्याने केला आहे.
पत्रकार अशोक पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ते त्यांच्या कॅमेरामनसोबत जुहूहून कांदिवलीला कारने जात होते. त्यावेळी एका रस्त्यावर त्यांना सलमान खान सायकल चालवताना दिसला. यादरम्यान त्याने सलमानचा व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या दोन अंगरक्षकांची परवानगी मागितली. त्या अंगरक्षकांनीही त्याला परवानगी दिली होती. मात्र जेव्हा मी व्हिडीओ बनवत होतो तेव्हा मात्र सलमानने मला विरोध केला. त्यानंतर त्याच्या अंगरक्षकानेही त्याला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. सलमान खाननेही या पत्रकाराला मारहाण केली आणि नंतर त्याचा फोन हिसकावून घेतला, असा आरोप त्याने केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
याप्रकरणी त्यांनी अंधेरीतील डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात अशोक पांडे यांनी सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज इक्बाल शेख यांच्यावर शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप केला होता.(Salman Khan in discussion again; Order to appear in court in ‘that’ case)