Sale of adulterated milk :- नेवाशात भेसळयुक्त दुधाची विक्री?
Sale of adulterated milk in Nevasha? प्लँस्टिक पिशव्यांमध्ये दुधाची विक्री करीत आहेत. या दुधावर सध्या शंका व्यक्त केली जात असून या दुधाचे नमुने तपासावे अशी मागणी

नेवासा : नेवाशात काहीजण प्लँस्टिक पिशव्यांमध्ये दुधाची विक्री करीत आहेत. या दुधावर सध्या शंका व्यक्त केली जात असून या दुधाचे नमुने तपासावे अशी मागणी होत आहे. नेवाशात भेसळयुक्त Sale of adulterated milk in Nevasha? दुधाची विक्री होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नेवाशासह परिसरात काहीजण प्लँस्टिक पिशव्यांमध्ये पँक करून गायी व म्हशीच्या दुधाची विक्री करीत आहे. डेअरीच्या भावापेक्षा जास्त दर आकारून दुधाची विक्री केली जात आहे. ही दुधाची विक्री करताना संबंधित नकट्या मापाने दुधाच्या पिशव्या भरून ग्राहकांच्या माथी मारत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.
काही ठिकाणचे दूध फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यावर सायीचा थर येण्याऐवजी बर्फाचा थर दिसून येत आहे. काही दुधात साईचा स्थर तेलकट दिसून येत आहे. यावरून तालुक्यात दुधात भेसळ होत असल्याची चर्चा सध्या नेवासा तालुक्यात सुरु आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने सर्वच ठिकाणच्या दु़धाचे नमुने तपासून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.