साकीनाका बलात्कार प्रकरण , संजय राऊत म्हणतात हा तर …

0 564

नवी मुंबई –  साकीनाका बलात्कार (Sakinaka rape) पीडित महिलेचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मुत्यू झाला आहे. या नंतर या प्रकरणात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया देत हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे म्हणत या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते या वेळी ते म्हणाले की ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते टाळायला हवं. या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असं त्यांनी सांगितलं. या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही. कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे. तिच्या जीवनाची विटंबना झाली आहे. महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे. अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे. सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

बंद करून दाखवले याचे श्रेय घेणार का? नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

Related Posts
1 of 1,640

 पोलिसांना या पीडित महिलेचं स्टेटमेंट घेता आलं असतं तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या. अधिक माहिती मिळाली असती. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या लिंकच्या माध्यमातून मुख्य आरोपीला अटक केली आहे, असं सांगतानाच मी सकाळपासून पाहात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत आहेत. काही भूमिका मांडत आहेत. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशी ही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असं ते म्हणाले.

साकीनाका भागात ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला होता. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३७६ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून  मोहन चौहान या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. संपूर्ण घटना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बलात्कारानंतर, आरोपीने पीडितेला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर फरार झाले. पीडितेला एका टेम्पोमध्ये फेकण्यात आले होते. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: