
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने प्रथेप्रमाणे या वर्षीही तीन दिवस उलटूनही 31 मार्च 2022 रोजी मागील आर्थिक वर्षाचे बँक कॅश, ताळेबंद बंद न केले नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व चेअरमन अनेक वर्षे बँकेत नियमबाह्य कामकाज करत आहेत. शाखा अधिकारी यांना हाताशी धरत कर्जदाराच्या नावे हजारो रुपये नावे टाकत ती रक्कम वसुली हेडला जमा करायची आणि त्यानंतर बोगस बिले दाखखून रक्कम हडप करायची असा उद्योग गेली अनेक वर्षे राबवला जात आहे. अनेक वेळा तक्रारी केल्यावर सहकार खात्याने लेखापरीक्षणात ही बिले वसूल पात्र असल्याचा ठपका ठेवला असतानाही पुन्हा तोच फंडा याही वर्षी वापरण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पारनेर तालुका सैनिक सह बँकेतील पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा येथील सर्व शाखेत एकाच वेळेत जाऊन 31 मार्चची रोख कॅश तपासण्यात यावी, जानेवारी ते मार्च महिन्यातील बोगस बिले तपासावी व वार्षिक कॅश, ताळेबंद बंद करून शेरे द्यावे, 31 मार्च रोजीचे सर्व शाखेतील कॅश, ताळेबंद बंद विहित वेळेत केले नसल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. (Sainik Bank extended march to drop bogus bills; Fasting in front of the District Deputy Registrar’s Office of Injustice Redressal Service Committee)