सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या लेकीला डेट?; अनेक चर्चांना उधाण

0 576
Saif Ali Khan's son is dating 'this' actress Leki ?; Many discussions abound

 

मुंबई –  बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते तर कधी कधी या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे मुले मुली देखील त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. अशीच एक जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ती म्हणजे  सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम खान (Ibrahim Khan) आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक (Palak Tiwari) होय. समोर आलेल्या माहितीनुसार  इब्राहिम अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलकला डेट करत आहे. अशामध्येच या दोघांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये पलक चेहरा लपवताना दिसली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Related Posts
1 of 2,492

इब्राहिम आणि पलकचा एकत्रित व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पलक एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. पलक तिच्या कारमध्ये बसताच पाठोपाठ इब्राहिम देखील त्याच्या मित्रांबरोबर त्याच रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

पलकने पांढऱ्या रंगाचा टॉप, हिरव्या रंगाचा स्कर्ट आणि जॅकेट परिधान केला असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर इब्राहिमने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. पण यावेळी पलकने तिचा चेहरा न लपवता कॅमेऱ्याकडे हसत पाहिलं आहे. इब्राहिम-पलकच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला असला तरी याबाबत दोघांनीही सध्यातरी मौन पाळलं आहे.

 

 

एका मुलाखतीदरम्यान पलकला इब्राहिमसोबत असलेल्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, “आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. लोकं जे बोलतात त्या निव्वळ अफवा आहेत. म्हणूनच मी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या मित्र-मैत्रिंणींबरोबर बाहेर गेलो होतो. पण माझे आणि इब्राहिमचेच फोटो व्हायरल झाले. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.” इब्राहिमसोबत फक्त मैत्री असल्याचं पलकने त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: