सादिक पोलीस वाहनातून पळून जातानाच जखमी – प्राथमिक अहवाल

0 271
अहमदनगर –  १५ ऑगस्टच्या रात्री ७ ते ८. ३० दरम्यान भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सादिक बिराजदार (Sadik Birajdar)  या आरोपीला घेऊन जात असताना  पोलिसांच्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अपघातात जखमी झाला असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आला आहे. तर याप्रकरणात आरोपी आणताना हलगर्जी केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात दोन वेगवेगळ्या फिर्याद भिंगार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. एक फिर्याद मयत सादिक बिराजदारची पत्नी रुकसार बिराजदार यांनी  दिली आहे त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. या दोन्ही प्रकरणांची  चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर येतील घटनेचा तपास करून प्राथमिक अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आलेला आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये सदरची घटना ही पोलीस विभागाच्या आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. या संदर्भामध्ये अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

तपासाच्या प्राथमिक अहवालामध्ये सदरची घटना ही पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घडलेली आहे, हे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे, पण यासंदर्भातला अहवाल अंतिम आल्यानंतर सर्व बाबींचा उलगडा स्पष्ट होईल, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. आम्ही  फिर्यादीच्या चौकश्या केलेल्या आहेत. तसेच जे कोणी पोलिस या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाची खात्यांतर्गत चौकशीमध्ये या बाबी समोर आलेले आहेत. मात्र भिंगार कॅम्प मध्ये घडलेल्या प्रकाराचा सीआयडी स्वतंत्र तपास करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Posts
1 of 1,603

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आला असून यात प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पोलीसांकडून दाखल करण्यात आलेली फिर्याद, मृत्यूप्रकरणी दाखल झालेली अकस्मात मृत्यूची नोंद व बिराजदार यांच्या पत्नीने केलेली फिर्याद या सर्वांचा तपास सुरूच आहे. सीआयडीकरून सुरू असलेल्या तपासादरम्यान या सर्वांचा तपास होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीनंतर सीआयडी करून सुरू असलेल्या तपासात काय समोर येते हे पाहावे लागेल.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नोंदवला तहसीलदार ज्योती देवरे यांचा जबाब

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: