Russia -Ukraine War: Ukraine's retaliation against Russia; Oil Depot Destroyed Russia -Ukraine War: Ukraine's retaliation against Russia; Oil Depot Destroyed

 प्रतिनिधी DNA मराठी टीम 

मुंबई – मागच्या ४० दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या (Russia and Ukraine)युद्धामध्ये प्रथमच युक्रेनने रशियावर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्लामध्ये रशियाचा मोठा नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियामधील बेल्गोरोड शहरामध्ये युक्रेनने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये बेल्गोरोड शहरातला एक ऑइल डेपो उद्ध्वस्त (Oil Depot Destroyed) झाला आहे. त्यात रशियाचे दोन जण जखमी झाले आहेत.

तर दुसरीकडे कब्जा केलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातून रशियाने आपले सैन्य मागे घेतले असून, तो प्रकल्प पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गेला आहे. या अणुप्रकल्पातील वाढत्या किरणोत्सर्गाचा धोका लक्षात आल्याने रशियाच्या लष्कराने तिथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते.युक्रेनची ऊर्जा कंपनी एनेर्जोॲटमने सांगितले की, चेर्नोबिल अणुप्रकल्पाजवळील जंगलात खंदक खणत असलेल्या रशियाच्या सैनिकांना वाढलेल्या किरणोत्सर्गाचा सामना करावा लागला. जिवाला धोका आहे हे ओळखून त्यांनी या परिसरातून काढता पाय घेतला.

युक्रेनने पलटवार करून रशियातला बेल्गोरोड येथील ऑइल डेपो उद्ध्वस्त केला, तसेच युक्रेनने चेर्निहिवजवळील स्लोबोडा व लुकाशिवका या गावांवर पुन्हा ताबा मिळविला आहे. किव्ह व चेर्निहिववरील हल्ले कमी केल्याचा रशियाने दावा केला असला तरी, या दोन ठिकाणी अद्यापही हवाई, तसेच क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. रशियाने आणखी जोरदार हल्ले करण्याची पूर्वतयारी केली असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

आता पर्यंत या युद्धामुळे दोन्ही देशांचे खूप नुकसान झाले आहे. युक्रेनच्या अनेक खाजगी आणि सार्वजनिक मालमतेचा नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अनेक देशांनी रशियावर लागू केलेल्या निर्बंधामुळे रशियाचे मोठा आर्थिक नुकसान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *