
झेलेन्स्की यांच्या पत्रावर पुतिन संतापले
रशियन अब्जाधीश आणि चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोविच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे पत्र घेऊन व्लादिमीर पुतीन यांच्याकडे पोहोचले. या पत्रात राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युद्ध कोणत्या परिस्थितीत थांबवता येईल याबद्दल सांगितले होते. यावर संतप्त झालेल्या रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले, ‘मी युक्रेन नष्ट करीन’
आता पर्यंत युक्रेनमध्ये झालेल्या नुकसानावर एक नजर
युक्रेनच्या रिव्हने प्रदेशाचे गव्हर्नर म्हणाले की रॉकेट हल्ल्यामुळे तेल डेपोला फटका बसला. गेल्या काही दिवसांत रशियन क्षेपणास्त्रांनी तेलाचे 6 डेपो उद्ध्वस्त केले आहेत.
कीवचे महापौर विटाली क्लित्सको म्हणाले की युक्रेनची राजधानी कीवमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर युद्धात जवळपास 82 बहुमजली इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव शहरात रशियन गोळीबारात सुमारे 1,200 अपार्टमेंट्स नष्ट झाली आहेत. त्याच वेळी, 1,177 बहुमजली इमारती, 53 बालवाडी, 69 शाळा आणि 15 रुग्णालये रशियन सैन्याने नष्ट केली.
इतर अपडेट्स
शत्रु देशांच्या नागरिकांना रशियन व्हिसा मिळणे कठीण होईल, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे.
ब्रिटन युक्रेनला स्टार स्ट्रीक प्रणाली देईल. रशियाने आण्विक हल्ल्याची धमकी दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे.
युक्रेनच्या सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे.
अमेरिकेने जर्मनीमध्ये 6 नेव्ही इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर जेट आणि 240 सैनिक तैनात केले आहेत.
रशियाच्या हल्ल्याला पाठिंबा दर्शविणारे ‘Z’ अक्षर दाखवणाऱ्या व्यक्तींवर जर्मनीमध्ये कारवाई होऊ शकते.